‘ ताज ‘ चं शुद्धीकरण होणार

December 10, 2008 1:30 PM0 commentsViews: 140

10 डिसेंबर, मुंबई दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये उद्धवस्त झालेलं ताज महाल हॉटेल पुन्हा उभं करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेत. या हॉटेलला पुन्हा उभं करण्याचा निर्धार मॅनेजमेंटनं केलाय. ताज पुन्हा उभं करण्याचा निर्धार टाटांनी व्यक्त केला. कर्मचार्‍यांनी आता यासाठी काम करायला सुरुवात केलीय. ताजचं बांधकाम आणि एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तज्ज्ञांना बोलवण्यात आलंय. हॉटेलमधील जे भाग सुरक्षित आहेत तिथून पाहुण्यांचं राहिलेलं सामान गोळा कऱण्याचं काम सुरू आहे. या अतिरेकी हल्ल्यात ताजमध्ये अनेकांचे प्राण गेले आणि म्हणूनच सात धर्माच्या धर्मगुरुंना बोलवून शुद्धीकरण आणि शांती केली जाणार आहे. पारशी, ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, शीख, ज्यू आणि बौद्ध धर्मगुरूंना आमंत्रित केलं जाणार आहे.

close