तयारी दहावीची : इतिहास नागरिकशास्त्र (भाग – 2)

February 16, 2009 9:38 AM0 commentsViews: 65

तयारी दहावीची या 16 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात इतिहास नागरिक शास्त्र या विषयावर मार्गदर्शन या विषयावर चर्चा करण्यासाठी आय.ई.एस दिगंमबर पाटकर विद्यालयाच्या शिक्षिका कविता मसूरकर आल्या होत्या. कविता मसूरकर या गेली 23 वर्ष विद्यार्थ्यांना इतिहास – नागरिक शास्त्र विषय शिकवत आहेत. कविता मसुरकर यांनी तयारी दहावीचीमध्ये मार्गदर्शन करताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे – * परीक्षेत इतिहास या विषयावर 28 गुणांचे प्रश्न विचारले जातात. * नागरिकशास्त्र या विषयावर 12 गुणांचे प्रश्न येतात. * घटना पाठ करा. * सणावळींची यादी तयार करा. * शब्दमर्यादा पाळा. * लेखन सराव महत्त्वाचा आहे. * तेवढंच पुस्तक वाचन महत्त्वाचं आहे. * प्रकरण 1 ते 3 ला जास्त मार्क असतात. * सोप्या भाषेत उत्तरं लिहा. * स्वत:च्या शब्दात उत्तरं लिहा. * गाळलेल्या जागा भरा आणि जोड्या लावा यात खाडाखोड करू नये. * लघुत्तरी प्रश्नांच्या उत्तरात किमान 2 मुद्दे लिहा. * दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरात प्रस्तावना लिहा. * दीर्घोत्तरी प्रश्नात किमान 4 मुद्दे लिहा. * मुद्देसूद उत्तरं लिहा. * प्रत्येक मुद्यांना क्रमांक द्या. * नागरिकशास्त्रात प्रकरण 1,2,4 वर लघुत्तरी प्रश्न येतात. * पहिल्या आणि तिसर्‍या धड्यावर प्रश्न 6वा विचारला जातो. * प्रश्न क्र.7, 8साठी उत्तरात किमान 2 मुद्दे लिहा. * इतिहासात 1 ते 3 प्रकरणावर 1 प्रश्न 4 गुणांचा येतो. * 5 ते 9 धड्यांवर 2 प्रश्न 4 गुणांचे येतात. * 4,10 आणि 11व्या धड्यांवर वस्तुनिष्ठ आणि 3 गुणांच्या प्रश्नांची तयारी करा. * प्रकरण 1 ते 3 (क्रांतीयुगला) एकूण गुण- 11 मार्कांचे प्रश्न येतात. * प्रकरण 4 थं – पाश्चात्य साम्राज्यवाद या धड्यावर एकूण 6 गुणांचे प्रश्न विचारले जातात. * प्रकरण 5 ते 9 ( संघर्षाचे युग) या धड्यांवर एकूण 12 मार्कांचे प्रश्न विचारले जातात.

close