…तर बीपीओ इंडस्ट्रीत अडीच लाख नोकर्‍यांची कपात

December 10, 2008 4:10 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबर, नवी दिल्लीसोनल जोशीमंदीचा फटका बीपीओ इंडस्ट्रीला बसलेला आहे. त्यातच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा फटकाही या सेक्टरला बसणार आहे. मदत मिळाली नाही तर 2009 मध्येअडीच लाख नोकर्‍या कमी करण्याची पाळी येणार असल्याचं इंडस्ट्रीनं सरकराला सांगितलंय.अमेरिकेत सुरू झालेल्या मंदीची झळ भारतीय बीपीओ इंडस्ट्रीला बसायला लागलीय. 11 अब्ज डॉलर्सच्या या सेक्टरला सगळ्यात जास्त प्रोजेक्टस अमेरिकेकडून मिळतात. नॅसकॉमच्या पाहणीनुसार बीपीओ सेक्टरमध्ये 7 लाख कर्मचारी आहेत. 2009 च्या पहिल्या सहामाहीत यामध्ये अडीच लाख नोकर्‍या कमी होण्याची भीती आहे.' मंदीमुळे मोठी कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. आम्ही सरकारकडे मदत पॅकेज मागितलंय. पण ते लवकर मिळालं नाही तर खूप मॅनपॉवर कमी करावी लागेल ', असं बीपीओ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष समीर चोप्रा यांनी सांगितलं.जर नोकर्‍या कमी झाल्या तर त्याचा परिणाम कंपनीच्या प्रगतीवरही होईल. इन्फोसिसनं मागील वर्षाच्या 30 टक्के प्रगतीवरून यावर्षीची प्रगती 15 टक्के वर्तवलीय. ' जगात काय सुरू आहे, त्याचे परिणाम आपल्यावर होणारच. मंदी आहे याबाबत काही शंकाच नाही ', असं इन्फोसिस एम.डी.सीईआ एस. गोपालकृष्णन यांनी सांगितलं.नवीन गुंतवणूक न येण्याचा धोका मंदीमुळे होताच. मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनी भर घातलीय. यामुळेच आता बीपीओ कंपन्यांना यावर मात करण्यासाठी सरकारकडून आर्थिक पॅकेजची गरज आहे. या इंडस्ट्रीवर पुढची 5-10 वर्ष टॅक्स लावू नये, अशीही त्यांची मागणी असेल.

close