सलाम महाराष्ट्र (भाग-1)

February 17, 2009 1:32 PM0 commentsViews: 10

सलाम महाराष्ट्र (भाग-1)सलाम महाराष्ट्रमध्ये आज आपल्यासोबत होते निसर्ग मित्र बिभास आमोणकर.बिभास हे व्यवसायाने कमर्शिअल आर्टिस्ट आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. ते इथे आले आहेत ते पर्यावरणावर मनापासून प्रेम करणारा एक माणूस म्हणून.अनेक निसर्ग संवर्धन संस्थांच्या कार्यात ते सक्रिय सहभागी असतात. अनेक रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये त्यांनी भाग घेतलाय.सलाम महाराष्ट्रमध्ये बिभास यांनी त्यांच्या कामाबद्दल,अनुभवाबद्दल माहिती दिली.तसंच अकोल्याहून आपल्यासोबत होते प्रा.निशिकांत काळे.मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ते प्राध्यापक आहेत. वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत.अमरावतीच्या निसर्ग संवर्धन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी तंत्रज्ञानाचा वापर ,वन्यजीव संवर्धन,अपारंपरिक ऊर्जा, जैविक इंधन या क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. ग्रीन टीचर अवार्ड, बेस्ट लेक्चर अवॉर्ड त्यांना मिळाले आहे. शिवाय अल गोर यांच्या 120 सदस्यांच्या समितीत ते सदस्य आहेत.सातपुडा बचाव,व्याघ्र बचाव अशा अनेक मोहिमा त्यांनी राबवल्या आहेत.अधिक माहितीसाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close