‘ जमात-उद-दावा ‘ दहशतवादी संघटनेवर संयुक्त राष्ट्रसंघाची बंदी

December 11, 2008 5:07 AM0 commentsViews: 2

11 डिसेंबर, मुंबई ' जमात-उद-दावा ' या लष्कर-ए-तोयबाच्या राजकीय आघाडी सांभाळणार्‍या पाकिस्तानमधल्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीनं ही बंदी घातलीय. या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणात आलंय. भारतानं या संबंधीची आग्रही मागणी संघाकडं नोंदवली होती. त्यामुळे भारताचा हा मोठा विजय मानला जातोय. आता पाकिस्तान या संघटनेवर काय कारवाई करणार , ते महत्त्वाचं आहे.

close