विमा घेण्यापूर्वी (भाग 3)

February 18, 2009 1:17 PM0 commentsViews: 7

विमा घेण्यापूर्वी (भाग 3)आपलं रोजचं आयुष्य हे अतिशय गुंतागुंतीचं आणि अनिश्चित आहे आणि म्हणूनच आपलं आणि आपल्या कुटुंबीयांचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण विम्याची मदत घेत असतो.विम्याचे वेगवेगळे प्रकार, त्यातील गुतांगुत असा अनेक पैलूवर चर्चा करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे तक्रार मार्गदर्शक प्रसाद वाघ टॉक टाईममध्ये आले होते.मुळातच विमा घेताना आपली आर्थिक परिस्थिती, नोकरीची शाश्वती, भविष्यातील योजना या सगळ्यांचा विचार करून मगच विमा उतरवावा.अशावेळी योग्य एजंटची निवड फार महत्त्वाची असते. विमा उतरवणा-या अनेक कंपन्या आहेत. कोणतीही कंपनी निवडताना जाहिरातींना,आमिषांना बळी न पडता पॉलिसीची योग्य माहिती घ्या. आणि मगच आपले पैसे गुंतवा. कोणतीही पॉलिसी घेतल्यानंतरचे 15 दिवस हा कुलिंग टाईम असतो अशा वेळी तुम्हाला पॉलिसी रद्द करण्याची संधी असते.असेही त्यांनी सांगितलं.

close