कसाबला पोलीस कोठडी

December 11, 2008 5:08 AM0 commentsViews: 4

11 डिसेंबर, मुंबई मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालीय. कसाबला रिमांडसाठी आज किल्ला कोर्टात हजर केलं गेलं. कसाबला 27 नोव्हेंबरला पोलिसांनी गिरगाव चौपाटीजवळ जिवंत पकडलं होतं. त्यानंतर त्याला त्याच दिवशी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं कसाबला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, मुंबईवर हल्ला करून निरपराध नागरिकांचे बळी घेणार्‍या अतिरेक्याचं वकीलपत्र घेणार नाही, अशी भूमिका मंुबईतल्या वकिलांनी घेतलीय.

close