दुखणं अर्धशिशीचं (भाग – 1 )

February 19, 2009 1:45 PM0 commentsViews: 265

19 फेब्रुवारीच्या टॉक टाइम 'चा विषय होता दुखणं अर्धशिशीचं. त्याविषयावर बोलण्यासाठी डॉ. के. रविशंकर आले होते. आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि डोकेदुखी होऊन बसतात. याच डोके दुखीवर जर वेळीच उपाय केले नाहीत तर अर्धशिशीचा त्रास होऊ शकतो. अर्धशिशी हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये असं सल्ला डॉ. के. रविशंकर यांनी दिला. अर्धशिशीचा आजार असलेल्यांनी उन्हात जाणं टाळावं. तसंच जेवणाच्या वेळा पाळाव्यात. इडली आणि डोसा यांसारखे आंबवलेले पदार्थ खाणं टाळावं. टेंन्शन कमी घ्यावं. औषधं उपचारामुळे अर्धशिशीवर नियंत्रण ठेवणं शक्य आहेअसंही डॉ. के. रविशंकर यांनी सांगितलं. डॉ. के. रवीशंकर यांनी अर्धशिशीवर केलेलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close