इंग्लंडची सावध सुरुवात

December 11, 2008 7:35 AM0 commentsViews: 3

11 डिसेंबर, चेन्नई चेन्नई टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर इंग्लंडनं सावध सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या बिनबाद 100 धावा झाल्या आहेत. एम. ए. चिदंबरम स्टेडिअमचं पीच बॅटिंगला साथ देणारं आहे. पण ईशांत शर्मा आणि झहीर खान यांनी अचूक बॉलिंग करुन अ‍ॅलिस्टर कूक आणि अँड्र्यू स्ट्राऊस या इंग्लंडच्या ओपनर्सना फारशी संधी दिलेली नाही. भारतीय टीममध्ये आज दोन बदल करण्यात आलेत. एका टेस्टच्या बंदीनंतर गौतम गंभीर टीममध्ये परतलाय तर युवराज सिंगनेही अपेक्षेप्रमाणे टीममध्ये कमबॅक केलंय. इंग्लंडतर्फे आज ऑफ स्पीनर ग्रॅम स्वॅन टेस्ट पदार्पण करेल.

close