तयारी दहावीची – इंग्रजी (भाग – 3 )

February 20, 2009 1:04 PM0 commentsViews: 30

20 फेब्रुवारीच्या ' तयारी दहावीची ' या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं गेलं ते इंग्रजी विषयावर. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलच्या अमिता भागवत यांनी मार्गदर्शन केलं. इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना अमिता भागवत यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टीप्स पुढीलप्रमाणे – इंग्रजीची भीती बाळगू नका.स्पेलिंगच्या चुका टाळा. भाषांतराचा सराव करा. उत्तर पाठ न करता समजून घ्या.लिखाणात गिचमिड टाळा.लेटर रायटिंग आणि पॅरेग्राफ रायटिंगवर भर द्या.उत्तरं सोप्या भाषेत लिहा.छोटी छोटी वाक्य लिहा.प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घ्या.प्रत्येक पॅराग्राफ समजून वाचा.पॅराग्राफमधली वाक्य जशीच्या तशी लिहू नका.दररोज काही वेळ इंग्लिशला द्या.व्याकरणाचा सराव महत्त्वाचा.पत्रलेखन करताना पत्राचा विषय समजून घ्या.कथा नेहमी भूतकाळात लिहा.निबंध लेखनात काळाचा योग्य वापर करा.निबंधात शीर्षक महत्त्वाचं आहे.17 धडे आणि 7 कविता.2 कवितांवर हमखास प्रश्न विचारले जातात.एकूण प्रकरणं 24 आहेत. एकूण गुण 80.पत्रलेखन 4 गुण.पॅराग्राफ लेखन 4 गुण.अहवाल लेखन 4 गुण.स्पीच 4 गुण.पुस्तकामधल्या पॅराग्राफवर प्रश्न 20 गुण.पुस्तकाबाहेरच्या पॅराग्राफवर प्रश्न 20 गुण.रॅपिड रीडिंग 5 गुण.व्याकरणावर 5 गुण.पुस्तकं मोठ्यानं वाचण्याचा सराव करा,याचा उपयोग तोंडी परीक्षेतही होतो.अमिता भागवत यांनी तयारी तयारी दहावीची मध्ये केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर ऐकता येईल.

close