भुरटा चोर ते अतिरेकी : कसाबचा प्रवास

December 11, 2008 8:21 AM0 commentsViews: 4

11 डिसेंबरमोहम्मद कसाब मुंबईवरच्या हल्ल्यातील पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव जिवंत आरोपी म्हणजे मोहम्मद कसाब . या सगळ्या हल्ल्याची माहिती ज्याच्या कडून मिळू शकते, तो कसाब नक्की आहे कुठला, त्याची पार्श्वभूमी काय यावर एक नजर.मोहम्मद अजमल आमीर इमान हे लांब लचक नाव आहे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लष्कर-ए- तय्यबाच्या अतिरेक्याचं. हे लांबलचक नाव घेण्याऐवजी मुंबई पोलीस त्याला कसाब म्हणतात. कसाब म्हणजे कसाई. कसायापेक्षा उलट्या काळजाच्या याच मोहम्मद अजमलनं त्याचा साथीदार मोहम्मद इस्माईलच्या साथीनं सीएसटी रेल्वे स्टेशनवर तब्बल 55माणसं मारली. करकरे, कामटे, साळस्कर या अधिका-यांच्या हत्येत त्याचा हात होता. मोहम्मदचा कसाबचा जन्म 13 जुलै 1987चा. पाकिस्तानच्या ओकारा जिल्ह्यातील फरीदकोट गावात राहणारा. कसाब फक्त चौथी पास आहे. वडील दही पुरीची गाडी चालवतात.शाळेतून काढून टाकल्यावर तो आपल्या भावाकडे लाहोरला गेला. तिथं भुरटा चोर बनला. दरोडा घालण्यासाठी शस्त्र खरेदी करायला साथीदारांसोबत रावळपिंडीच्या बाजारात गेला असताना तिथे लष्कर-ए-तय्यबाची माणसं भेटली. दहशतवादी बनण्यासाठी प्रचार करत होती. कसाब लष्करमध्ये दाखल झाला तो इस्लामवरच्या प्रेमापोटी नाही. तर रायफल चालवायला शिकलो तर मोठे दरोडे घालता येतील या उद्देशाने. लष्करच्या दोन महिन्याच्या ट्रेनिंगनं मोहम्मद बदलला. तिथं त्याचं ब्रेनवॉशिग करण्यात आलं. काश्मीर, गुजरातमधील गोध्रा इथली मुस्लिमांवरील कथित अत्याचाराच्या कहाण्या ऐकून तो बदलला. कट्टर जिहादी बनला. दहशतवादाचा अ‍ॅडव्हान्स कॅम्प आणि त्यानंतर मरीन कमांडो कॅम्पचं ट्रेनिग त्यानं पूर्ण केलं. लष्करच्या कमांडरनं मोहम्मदच्या वडिलांना भरपूर पैसे दिले. बदल्यात त्याला मुंबईवरील हल्ल्यासाठी पाठवलं गेलं. मेला तर घरच्यांना आणखी दीड लाख रुपये देण्याचा वादा केला गेला. पण मोहम्मद अजमल मुंबई पोलिसांच्या तावडीत सापडला. यामुळे पाकिस्तानातील दहशतवादाचा प्रत्यक्ष पुरावा जगासमोर आला.

close