मंदीतली गुंतवणूक (भाग-1 )

February 22, 2009 10:07 AM0 commentsViews: 2

मंदीतली गुंतवणूक (भाग-1 )दर आठवड्याला आपण या कार्यक्रमातून गुंतवणुकी विषयीच्या अडचणी सोडवतो.यावेळी आपण चर्चा केली ती मंदीच्या काळात करायच्या गुंतवणुकीविषयी…विशेषतः शेअरबाजारातल्या गुंतवणुकीविषयी. याविषयीची माहिती दिली मार्केट ऍनालिस्ट राजेश तांबे यांनी. मंदीच्या काळाचा फायदा कसा घ्यायचा याचा सल्ला त्यांनी दिला. सद्याच्या काळात शेअरमार्केटमध्ये झटपट फायदा मिळणार नाही. दीर्घ मुदतीसाठीच गुंतवणूक करणं योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. किमान 2012 पर्यंत गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. मंदीचा काळ असल्याने चांगल्या त्याच कंपन्या टिकतील आणि वाईट बाहेर पडतील त्यामुळी पुन्हा तेजी येईल तेव्हा फक्त चांगल्या कंपन्याच उरलेल्या असतील असं त्यांनी सांगितलं. पण या काळात टिप्सवर विश्वास ठेऊन खरेदी करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय.- एखादा शेअर घेताना त्यावरचं ब्रोकरेज हाऊसचं मत तपासा- कंपनीची माहिती शेअर्स विकत घेण्यापूर्वी तपासून द्या- एखादा शेअर झपाट्याने वधारला तर त्यामागचं कारण तपासा- 'टीप'वर विश्वास ठेवण्यापूर्वी ती माहिती पडताळून घ्या

close