युथ ट्युब भाग 2 – थिंक जीपीएस ग्रुप

February 23, 2009 9:31 AM0 commentsViews: 6

युथ ट्युब – भाग 2थिंक जीपीएस ग्रुपजीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशन सिस्टिम. जीपीएस सिस्टिम युएस आर्मीसाठी तयार केलं होतं. त्यानंतर आता या सिस्टिमचा वापर रस्ते वा एखादं ठिकाण शोधण्यासाठी केला जातोय. या जीपीएस सिस्टिमवर आधारित थिंक जीपीएस नावाची वेबसाइट अंबरनाथच्या सम्राट, चिंतामणी, सुमीत आणि आनंद या चौघांनी मिळून तयार केली आहे. या साइटवर तुम्हांला जीपीएससंबंधी सगळया प्रश्नांची उत्तर मिळू शकतील. आता या चौघांना ह्या सिस्टिमचा वापर करून भारतातल्या अनेक भाषेत नकाशे तयार करायचे आहेत. तसंच या चौघांनी जीपीएस सिस्टिमद्वारे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ जवळील झाडाचा डेटा तयार केला आहे.फ्लेक्सपासून पवनचक्कीटाकाऊ वस्तूपासून टिकाऊ बनवण्याच्या अनेक कल्पना आहेत. त्यापैकीच एक आगळी वेगळी पवनचक्की बनवली नाशिकच्या विद्यार्थ्यांनी. त्यांनी जाहिरातींचे फ्लेक्स आणि सायकलपासून पवनचक्की तयार केली आहे. याभागापासून आम्ही युथ ट्युब डाऊनलोड हे नवीन सेक्शन सुरू केलं आहे. ह्या कार्यक्रमात जॅझ म्युझिकचा आयकॉन हर्बी हॅनकॉन यांच्या गाणी डाऊनलोड करण्यासाठी कोणता फंडा वापरचा हे पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close