आरोग्य स्त्रियांचं (भाग 2)

February 23, 2009 12:13 PM0 commentsViews: 71

आरोग्य स्त्रियांचं (भाग 2)

बदलत्या जीवनशैलीमुळे स्त्रियांच्या आरोग्यांचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि म्हणूनच टॉक टाईममध्ये स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ.अलका गोडबोले यांनी स्त्रियांच्या समस्यांबाबत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.मुळातच स्त्री जर निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी असतं.म्हणून घरच्या स्त्रीनं आणि तिच्या कुटंुबानही तिच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.हल्ली पाळी येण्यांचं प्रमाण खूप अलिकडे म्हणजे 9 ते 10 वर्षांवर येऊन पोहचलं आहे.त्यामुळे सगळ्या मुलींना आपल्यात होणा-या शारीरिक आणि मानसिक बदलांची माहिती योग्य वयात आणि योग्य व्यक्तीकडून मिळणं गरजेचं आहे.तसेच पाळी येणं ही अंत्यत नैसर्गिक गोष्ट आहे,त्याचा संबंध देवाशी लावून घरी पूजा,सण,समारंभ असल्यानं पाळी पुढे मागे ढकलण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नये. प्रत्येक स्त्रीने आपला आहार आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे.रोजची नाश्ताची जेवणाची वेळ पाळावी.अयोग्य पध्दतीनं डाइट करू नये अशा अत्यंत महत्त्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या.

close