योगासनं आणि आरोग्य (भाग – 2)

February 24, 2009 9:12 AM0 commentsViews: 357

24 फेब्रुवारीच्या ' टॉक टाइम'मध्ये चर्चा झाली ती ' योगासनं आणि आरोग्य ' या विषयावर. योग शिक्षिका शिल्पा जोशी यांनी याविषयावर मार्गदर्शन केलं. रोजची ऑफिसची धावपळ, कामाचं टेन्शनमुळे आपण आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन हरवत चाललो आहोत. तर उत्तम मानसिकता आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी वेगवेगळी योगासनं आहेत. प्रत्येक आसनं योग्य पध्दतीनं केली तर त्याचा शरीराला फायदा होतो. शरीराला ताण बसून शरीराची लवचिकता वाढते. पचन सुधारतं. रक्ताभिरण सुधारते.पाठीचा कणा मजबूत होतो, असे अनेक फायद शिल्पा जोशी यांनी त्यांनी चर्चेत सांगितले. मात्र योगासनं करताना यात नियमितता असली पाहिजे.तरच शरीर आणि मनाला फायदा होतो आणि स्वास्थ सुधारतं, असा सल्ला शिल्पा जोशी यांनी 'टॉक टाइम 'मध्ये दिला. योगासनं करण्याची योग्य वेळ : सकाळी लवकर उठून केल्यास उत्तम.संध्याकाळी पोट रिकामं असताना.जेवणानंतर तीन ते चार तासानंतर.योगासनं करताना घ्यायची काळजी.आसनं सावकाश करावीत.आपल्या क्षमतेनुसार ताण द्यावा.डोळे बंद ठेवून शरीरातील संवेदनांकडे लक्ष द्यावं.आसनांमध्ये टप्प्याटप्प्यानं प्रगती श्वासाची गती सहज ठेवावी.योगासनांचे फायदे : शरीराची लवचिकता वाढते.पचन सुधारतं.रक्ताभिसरण चांगलं झाल्यानं दूषित घटक शरीराबाहेर फेकले जातात.पाठीचा कणा बळकट आणि लवचिक होतो.शरीर आणि मन यांचं चांगलं संतुलन साधलं जातं.शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक कार्यक्षमता वाढतं.

close