तयारी दहावीची- सायन्स I ( भाग – 3 )

February 24, 2009 10:20 AM0 commentsViews: 32

तयारी दहावीची- सायन्स I ( भाग – 3 )तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता सायन्स I. या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत होते ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलचे सुरेश जंगलेसर. सायन्स I या विषयाचं मार्गदर्शन करताना सुरेश जंगलेसरांनी महत्त्वाच्या टीप्स दिल्या त्यापुढीलप्रमाणेउत्तर मुद्देसूद लिहावीभाषा शास्त्रीय असावीशास्त्रीय तत्व अधोरेखित करावंसूत्र पाठ करा, प्रमाणबद्ध आकृत्या सुबक काढाखाडाखोड टाळा, नियम पाठ कराभौतिक राशींची दर्शक चिन्हे आणि एकके याची माहिती हवीशास्त्रीय कारण लिहितांना मुद्यांना क्रमांक टाकून लिहावेवस्तुनिष्ठता हा विज्ञानाचा पाया आहे म्हणून उत्तरात अचूकता आवश्यक आहे व्याख्या, नियम, संज्ञा या पुस्तकाप्रमाणेच हव्यात उदाहरण सोडवतांना दिलेल्या भौतिक राशी एकाच एकक पद्धतीत करून घ्या किरणाकृती असल्यास बाणांची योग्य दिशा आवश्यक फरकाचे चार मुद्दे लिहावे समान निकषाचे मुद्दे समोरासमोर लिहावेटीप लिहितांना क्रमांक टाकून मुद्दे आणि योग्य ती उदाहरणे द्यावीत दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर लिहितांना प्राधान्य क्रमाने मुद्दे लिहावेत

close