तयारी दहावीची- सायन्स II ( भाग- 2)

February 25, 2009 11:32 AM0 commentsViews: 11

तयारी दहावीची- सायन्स II ( भाग- 2)तयारी दहावीची या कार्यक्रमात 25 फेब्रुवारीचा विषय होता सायन्स II. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर होत्या मुंबईमधल्या गोरेगाव इथल्या नंदादीप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वसुधा साठे. या कार्यक्रमात साठे मॅडमनी सायन्स II या विषयातले महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते पुढीलप्रमाणे, उत्तर मुद्देसूद लिहावं, भाषा शास्त्रीय असावी, सूत्र पाठ कराआकृत्या सुबक आणि प्रमाणबद्ध काढा, खाडाखोड टाळागाळलेल्या जागा किंवा पर्यायी गाळलेल्या जागा यासाठी पूर्ण विधानं लिहून घ्यारिकाम्या जागी भरलेला शब्द अधोरेखित करा किंवा त्याला चौकट कराजोड्या लिहिताना प्रश्न लिहू नका फक्त उत्तराच्या जोड्या लिहाशास्त्रीय कारणे अन्य लघुत्तरी प्रश्न मुद्देसुद लिहा. महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित कराफरकाचे मुद्दे 2 स्तंभ करूनच लिहा.एकाच मुद्याचा फरक दोन्हीकडे असावारासायनिक समीकरणे अचूक लिहा त्यासाठी अभिक्रियात्मक व उत्पादिते यांची योग्य रेणूसूत्रे पाठ असणे आवश्यकअभ्यासात 5 संमिश्र धातू आहेत त्यांची नावं आणि घटक मूलद्रव्य हे पाठ असावेतदुस-या प्रकरणातील संयुगाची नावं रासायनिक ,व्यावहारिक आणि त्याचे सूत्र पाठ असणे आवश्यकनिरनिराळ्या व्याख्या पुस्तकाच्या भाषेत लिहाव्यात, कार्य किंवा आकडे लिहिताना 1, 2, 3 आकडे घालून लिहावेत.

close