दहशतवाद्यांना ठाऊक नव्हतं बॉम्ब वापरण्याचं तंत्र

December 11, 2008 8:50 AM0 commentsViews: 4

11 डिसेंबर मुंबईसंजयसिंग दहशतवाद्यांनी बॉम्बचा वापर केला. त्यात अनेक लोक मृत्यूमुखी पडलेच पण वित्तहानीही मोठयाप्रमाणात झाली. पण आश्चर्य वाटेल की दहशतवाद्यांना बॉम्ब वापरण्याच तंत्र अवगत नसल्यामुळे मोठा संहार टळला.अजमल कसाबसहीत दहशतवाद्यांच्या पाठीवर लटकलेल्या बॅगमध्ये बॉम्ब होते. मुंबईत अनेकांचा जीव घेण्यासाठी हे बॉम्ब आणले होते. पण दहशतवादी या बॉम्बच्या तारांमुळे गोंधळले. त्यांच्या गोंधळामुळेच मुंबईत अनेकांचे जीव वाचले. मुंबईतल्या गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोटकरून मोठ्याप्रमाणावर, लोकांना ठार करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. पण त्यांना स्फोटकं जोडण्याची ट्रेनिंग देण्यात आली नव्हती.त्यामुळे आरडीएक्सच्या तारांमध्ये त्यांचा गोंधळ उडाला.मुंबई पोलिसांच्या हाती सापडलेल्या अजमल कसबनं याचा खुलासा केला आहे. कसाबनं सांगितलं की, त्याला आणि त्याच्या साथिदारांना, स्फोटकांबाबत कुठलही विशेष ट्रेनिंग देण्यात आलं नव्हतं. त्यांना फक्त कुठली तार कुठं जोडायची एवढचं सांगण्यात आलं होत. तसंच स्फोट घडवण्याअगोदर बॅटरी कशी जोडायची एवढचं सांगण्यात आलं होतं. पण कसाबने सांगितलं की त्याला आणि त्याच्या साथिदारांना हा तारांचा गोंधळ समजलाच नाही. त्यामुळे त्यांनी ती सगळी माहिती त्यांनी लिहून घेतली होती. स्फोटकांच्या बॉक्सवर चिपकवण्यात आलेली सगळी माहिती उर्दूत लिहण्यात आली होती. जिथं गर्दी आणि पोलीस असेल. त्या ठिकाणी हे बॉम्ब ठेवायला सांगण्यात आलं होतं.सीएसटीवर गोळीबार करणा-या कसब आणि अबू इस्माईलकडेही आरडीएक्स भरलेल्या दोन बॅग देण्यात आल्या होत्या. त्यातली एक बॅग त्यांनी टॅक्सीमध्ये ठेवली. त्या टॅक्सीत स्फोट झाला. आणि सीएसटीवर पोहचल्यानंतर अबू इस्माईलनं दुसरी बॅग गर्दीत ठेवून दिली. त्यानंतर त्यांनी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबारी केली.त्यांची योजना अशी होती की, गोळीबारात ठार आणि जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस येतील तेव्हा हा स्फोट व्हावा. पण तसं घडलं नाही, कारण इस्माईलला बॉम्ब कनेक्ट करता आला नाही. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या सामानाबरोबरचं तो बॉम्बही स्टोअर रुममध्ये जमा केले.बॉम्बबद्धल माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब डिफ्यूझ केले. अशा प्रकारे 10 दहशतवाद्यांना 10 बॉम्बच्या जोरावर मुंबईत भीषण संहार घडावायचा होता. पण 10 पैकी फक्त 2 बॉम्बचा स्फोट झाला आणि मुंबईत होणारा मोठा संहार टळला.

close