गप्पा ना. धों महानोरांशी (भाग : 1)

February 27, 2009 5:02 AM0 commentsViews: 8

27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषादिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त सलाम महाराष्ट्र'चे पाहुणे होते यंदाचे जनस्थान पुरस्कार विजेते ना. धों. महानोर . जात्यावरच्या गाण्यांनी, ओव्यांनी मराठी कवितेला, भाषेला समृद्ध केलं आहे. जात्यावर बसून गाणी म्हणताना या ग्रामीण भागातल्या स्त्रिया आपलं सूखदु:ख विसरतात. कवी ना. धों. महानोरांनी एका ठिकाणी सुंदर म्हटलं आहे की , कवितेनं जगणं सुंदर केलं नि दु:ख हलकं केलंय.' तेच प्रसिद्ध कवी ना.धो. महानोर भाषा दिनाचे सलाम महाराष्ट्र'चे पाहुणे म्हणून आले होते. कवी ना.धों.महानोर.ग्रामीण साहित्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ' रानातल्या कविता ',' पानझड ' हे त्यांचे कविता संग्रह खूप गाजले.जैत रे जैत या चित्रपटातली त्यांच्या गाण्यांनी सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं.निसर्गावरचं विलक्षण प्रेम त्यांच्या सगळ्या साहित्यातून बघायला मिळतं. ना.धों.महानोरांनी मराठी भाषेची वैशिष्ट्य सांगितली ती त्यांच्या कवितेतून. तर त्यांच्या कविता ऐकण्यासाठी शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close