औरंगाबादमधल्या भंगाराच्या दुकानाला मोठी आग

December 11, 2008 11:15 AM0 commentsViews: 3

11 डिसेंबर औरंगाबादशेखलाल शेखऔरंगाबादमधल्या मौलाना आझाद चौकातल्या भंगाराच्या दुकानाला मोठी आग लागली. आग लागल्यानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 6 गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. आता ही आग विझवण्यात आली आहे.या भंगाराच्या दुकानाच्या मालकाने फायर ब्रिग्रेडतर्फे देण्यात येणारं ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं नव्हतं. चुकीच्या व्यवस्थापनामुळे ह्या भंगाराच्या दुकानाला आग लागली असं फायर ब्रिगेडच्या अधिका-यांच म्हणंण आहे. या आगीत 8 ते 10 लाखाचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नाही असं फायर ब्रिगेडच्या अधिका-यांनी सांगितलं. दुकानाच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे स्लमएरिया असल्यामुळे या दुकानाकडे जाण्यासाठी एकच रस्ता आहे. रात्रीच्यावेळी आग लागली असती तर मोठी हानी झाली असती.

close