व्याजातून उत्पन्न (भाग- 1 )

February 28, 2009 6:08 PM0 commentsViews: 8

व्याजातून उत्पन्न (भाग- 1 )काही व्यक्तींच्या आयुष्यात कधी अशीही वेळ येते जेव्हा हातात येणारं नियमित उत्पन्न असतं तर किती बरं झालं असतं असं वाटून जातं. अचानक घेतलेली व्हिआरएस, रिटायरमेंट, अचानक नोकरी जाणं असे कितीतरी प्रसंग उद्भवतात. अशावेळी नुसती बचत उपयोगाची ठरत नाही. तेव्हा मोठ्या रक्कमेतून दरमहा येणा-या व्याजाचा मोठा आधार वाटतो. दर महिण्याला मिळणा-या व्याजाची आखणी कशी करायची यासंबंधीचा आढावा आम्ही यावेळच्या श्रीमंत व्हा या कार्यक्रमामध्ये घेतला. या विषयावर अर्थतज्ज्ञ अनिल हरोळीकर यांनी मार्गदर्शन केलं. अर्थतज्ज्ञ अनिल हरोळीकर सांगतात, दरमहा व्याजासाठी उत्पन्न मिळवताना आपली आर्थिक कुवत, त्या योजनेमधली जोखीम आणि फायदे अशा सर्वच गोष्टींचा विचार केला पाहिजे. फक्त दरमहा व्याज मिळवायचं असा निकष न लावता त्याचा दीर्घकालीन मुदतीत उपयोग कसा होईल याचीही आखणी केली पाहीजे. दरमहा व्याजाच्या उत्पन्नाविषयी बोलताना हरोळीकर यांनी भविष्यासाठी दरमहा व्याज मिळवण्यासाठी तरुण वयापासूनच सुरुवात केली पाहिजे असा सल्ला दिला. शक्यतो एकत्रित गुंतवणूक करू नये असंही ते म्हणाले. दरमहा व्याज देणा-या योजनांमध्ये गुंतवणूक करताना सुरक्षितता हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. विशेषत: खाजगी कंपनींच्या फिक्स डिपॉझिट्समध्ये जोखीम असते अशी सूचना त्यांनी दिली. थोडक्यात स्थिर नियमित उत्पन्न आणि कमी जोखीम पत्करायची असेल तर दरमहा व्याज देणा-या अशा योजनांचा उपयोग होऊ शकतो.

close