मनसेच्या आंदोलनामुळे इचलकरंजीतील 30 % उद्योग बंद

December 11, 2008 12:08 PM0 commentsViews: 113

11 डिसेंबर इचलकरंजीप्रताप नाईक मनसेने अमराठीच्या मुद्यावरून केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या मॅचेस्टरला घरघर लागली आहे.आंदोलनामुळे इचलकरंजीतील 30 % उद्योग बंद झाले आहेत.त्यामुळे रोज 14 कोटीचं नुकसान होतं आहे.मनसेनं अमराठी मुद्यावरून केलेल्या आंदोलनामुळे अनेक वाद निर्माण झाले. पण या आंदोलनाचा खरा फटका महाराष्ट्रातील मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणा-या इचलकरंजीतील वस्रद्योगाला बसला.आंदोलनाची भीती घेऊन आपापल्या राज्यात गेलेले कामगार परत यायला आता तयार नाहीत. त्यामुळे इथल्या 30% उद्योगाला कामगाराविना घरघर लागली आहे. इचलकरंंजी इथले उद्योजक सुनील निवळे सांगतात, मनसेच्या आंदोलनामुळे आणि त्यानंतर दिवाळीत कामगार आपापल्या घरी गेले. कामगारांची टंचाई निर्माण झाल्यामुळे आमच्याकडे एक पाळी बंद करावी लागली . एक लाख कामगार आमच्या उद्योगात असल्यामुळे 10 ते 20 हजार कामगार जे गेले ते परत आले नसल्यामुळे 30ते40% उद्योग अजून बंद आहे. त्यामुळे दररोज तयार होणा-या कापडाच काम थांबलेलं आहे त्यामुळे रोज 14 कोटी रुपयांच नुकसान होतं आहे.एवढचं नव्हे इचलकरंजीतील वस्रोद्योगाला जागतिक मंदीचाही फटका बसला आहे. त्याच्यामुळे कोट्यावधी रुपयांच कापड पडून आहे. लोडशेडिंग,सूत दरात होणारी वाढ आणि जागतिक मंदी यामुळे जेरीस आलेली वस्रोद्योग नगरी आता कामगारांच्या कमतरतेमुळे आणखीणच अडचणीत आली आहे.

close