धोका रुळांवरचा

March 4, 2009 2:00 PM0 commentsViews: 4

मुंबईत होणारे वाढते रेल्वे अपघात पाहता 4 मार्चच्या टॉक टाइमचा विषय होता धोका रुळांवरचा. या विषयावर रेल्वे पोलीस निरीक्षक संदीप खिरीटकर यांनी मार्गदर्शन केलं. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात रेल्वे ही आपल्या रुटीनचा खुप मोठा हिस्सा असते. रोजची गर्दी, डब्यातील भांडणं आणि मार्‍यामार्‍या या सगळ्यांमुळे आपला ट्रेनचा प्रवास नकोसा वाटतो. परंतु रेल्वेनं प्रवास करताना जर आपण काही नियम पाळले तर हा प्रवास सुखकर होऊ शकतो. हेच टॉक टाइममध्ये संदीप खिरटकर यांनी सांगितलं. " वेळ वाचवण्यासाठी रुळ ओलांडणं, रेल्वे फाटक क्रॉस करणं या गोष्टी केल्या जातात. आपल्या जीवापेक्षा महत्त्वाची कोणतीही गोष्ट असू शकत नाही हे लोकांना समजलं पाहिजे. त्यासाठी आम्ही लोकांना माहिती सांगतो, निरनिराळी पत्रकं वाटतो. ज्यामुळे लोकांमधली सुरक्षीत रेल्वे प्रवासाबाबत जागृती वाढेल, असं संदीप खिरीटकर यांनी सांगितलं. संदीप खिरीटकर रेल्वेप्रवाशांची निरनिराळ्या मार्गानं जागृती करतात. " लोकांनी रूळ क्रॉस करू नये म्हणून लहान मुलांचा वापर आम्ही केला. त्यांच्या हातात एक गुलाबाचं फूल देऊन विनंती करायची की रूळ ओलांडू नका. ट्रेनमध्ये सोन्याचे दागिने घालून प्रवास करू नका असंही मुलांच्या मार्फत त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, " असं संदीप खिरटकर म्हणाले. तुम्हाला ट्रेनमध्ये कोणत्याही पकारची संयशित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरीत रेल्वे पोलिसांना कळवा, मोठ्या प्रवासात आपल्या सहप्रवासांकडून कोणतीही खाण्याची वास्तू घेऊ नये,असं महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीसाठी रेल्वेची हेल्पलाईन आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधून मदत मागू शकतो. रेल्वे पोलीस फोर्स नं – 22620800रेल्वे हेल्पलाईन- 9833331111

close