गुंतवणूक महिलांसाठी

March 10, 2009 6:48 AM0 comments

गुंतवणूक महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं यावेळच्या श्रीमंत व्हामध्ये महिलांनी पैशांचं नियोजन आणि त्यांची गुंतवणूक कशी करावी या विषयावर चर्चा केली. गुंतवणूक आणि कर सल्लागार धनश्री केळकर यांनी या विषयावर मार्गदर्शन केलं. महिलांसाठी अर्थनियोजन आणि बचत तसंच गुंतवणूक याचं महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं. वेगवेगळ्या वयात आणि विविध क्षेत्रात असणा-या स्त्रियांनी त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार गुंतवणूक करावी पण जोखीम शक्यतो कमी घ्यावी असंही त्यांनी सुचवलं. पैशांचं नियोजन, व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टींचं भान ठेवलं पाहीजे हे ही त्यांनी सांगितलं. महिला मार्केटमध्ये कोणत्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात याचंही त्यांनी विश्लेषण दिलं. उत्पन्नातून मिळणा-या पैशांचा किती हिस्सा गुंतवला जावा यावर या कार्यक्रमात चर्चा केली. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या वेळेत महिलांकडे पैशांची उपलब्धता असली पाहीजे यावरही त्यांनी भर दिला. एकूणच आयुष्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर महिलांनी भविष्याचा विचार करून पैशांच्या नियोजनाचे आणि गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत असा सल्ला त्यांनी दिला.