गप्पा जितेंद्र जोशीबरोबर

March 10, 2009 1:55 PM0 commentsViews: 6

10 मार्चला होळी होती. होळीचं औचित्यसाधून टॉक टाइममध्ये जितेंद्रशी गप्पा मारायला मिळाल्या. अभिनेता,कवी आणि लेखक ही ओळख असणा-या जितेंद्र जोशीनं प्रेक्षकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. जितेंद्र सांगतो, " रंगभूमी, टी.व्ही आणि सिनेमा या सगळ्याच माध्यमात काम करायला मला आवडतं. प्रत्येक माध्यमाची स्वत:ची अशी खासियत आहे. नाटकात आपल्याला रिटेकची संधी नसते,मात्र आपण केलेल्या कामाची दाद लगेच मिळते. " जितेंद्रने कार्यक्रमात होळीच्या आठवणी सांगितल्या. तो सांगतो, " लहानपणी मला होळी खेळायला खूप आवडायचं.परंतु घरचे सोडायचे नाहीत अशीही आठवण त्याने सांगितली. आता पूर्वी इतका निवांतपणा मिळत नाही. मला तर होळी खूप आवडते. होळीचा सीन असलेलला सिनेमा करायला खूप आवडेल. होळीचे रंग,पाणी या सगळ्या मनाला आनंद देणार्‍या गोष्टी आहेत असेही त्याने सांगितले. " अनेक गाणी, कविता म्हणून त्यानं प्रेक्षकांना खुष करून टाकलं.

close