दातांचं सौंदर्य

March 11, 2009 11:53 AM0 commentsViews: 98

11 मार्चच्या टॉक टाइमचा विषय होता दातांचं सौंदर्य. याविषयावर कॉस्मॅटिक डेंटिस्ट डॉ.प्रीती मेहता यांनी मार्गदर्शन केलं. दातांच्या आरोग्याबरोबरच विचार केला जातो तो त्याच्या सौंदर्याचा.आपली स्माईल ही आपल्या व्यक्तिमत्वात मोलाची भर घालत असते.ज्याप्रमाणे डोळ्यांना वेगवेगळ्या रंगाच्या लेन्स लाऊन त्यांचं सौंदर्य वाढवलं जातं. त्याचप्रमाणे मुळचं किंवा अंगभूत सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी कॉस्मॅटिक या शास्त्राचा उदय झाला आणि दातांच्या बाबतीत हे शास्त्र फारच उपयोगी ठरत आहे. ते कसं याची माहिती कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉ. प्रीती मेहता यांनी दिली. म्हणजे दातांमध्ये वेगवेगळे खडे बसवण्यापासून ते दातांच्या वेड्यावाकड्या रचनेपर्यत अनेक समस्या या कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीमुळे दूर होऊ शकतात. योग्य ट्रिटमेन्टनंतर गरज असते ती चांगल्या देखभालीची. अशा पेशंटन्सना वर्षांतून दोन वेळा डेन्टिस्टकडे जावं लागतं,2-3 वेळा ब्रश करावं लागतं. असंही त्यांनी सांगितलं.

close