पोर्टो टीमने अर्सेनलचा 2-0 असा पराभव केला

December 11, 2008 9:57 AM0 commentsViews: 2

11 डिसेंबर चॅम्पियन लीगमध्ये मॅचेस्टर युनायटेडला ग्रुपमध्ये पहिलं स्थान मिळालं. पण अर्सेनलला त्यांच्या ग्रुपमधलं पहिलं स्थान राखू शकले नाहीत. शेवटच्या मॅचमध्ये पोर्टो टीमने त्यांचा 2-0 असा पराभव केला. मॅचच्या पहिल्या हाफमध्ये पोर्टोच्या ब्रुनो अ‍ॅल्वेसने पहिला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. दुस-या हाफमध्येसुद्धा अर्सेनलला काही खास करता आलं नाही. पोर्टोच्या लिसान्ड्रो लोपेझने गोल करत टीमची आघाडी 2-0ने वाढवली. अर्सेनलला ही आघाडी कमी करता आली नाही. ग्रुपमध्ये अर्सेनलने 11 पॉईंट्स मिळवलेत पण या विजयामुळे पोर्टोने अर्सेनलच्या वरचं स्थान मिळवलं आहे.

close