लोणची आणि मुरांबे

March 13, 2009 12:40 PM0 commentsViews: 404

लोणची आणि मुरांबेउन्हाळा जवळ येत चालला आहे,आणि आता घरोघरी लोणची तयार करणं सुरू होईल म्हणून टॉक टाइममध्ये वेगवेगळे लोणचे आणि मुरांबे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे पाककला तज्ज्ञ स्मिता नाबर आल्या होत्या. त्यांनी पारंपारिक लोणची आणि मुरांबे कसे बनवयाचे याबद्दल मार्गदर्शन केलं. स्मिता नाबर यांच्यानुसार कोणत्याही प्रकारची लोणची करताना त्यात मीठाचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. अन्यथा लोणची लवकर खराब होतात. आंब्याच्या फोडी बुडतील इतकं तेल टाकणं आवश्यक आहे. तेल आणि मीठ हे नैर्सगिक प्रिझर्व्हटिव्ह म्हणून काम करतात. कैरीचा छुंदा आणि लिंबाच्या लोणच्याला चांगला रस सुटण्यासाठी ते उन्हात ठेवणं आवश्यक आहे. लिंबाचं गोड आणि तिखट अशी दोन्ही प्रकारची लोणची करता येतात. लोणच्याबरोबर दुसरा साठवणीचा प्रकार म्हणजे मुरांबा. उन्हाळ्यात आंबे असतात म्हणून आंब्यापासून मुरंबा तयार करतात. पण अशाप्रकारे अननस, स्ट्रॉबेरी यासारख्या फळांचाही मुरंबा तयार करू शकतात. हे मुरंबे टिकवण्यासाठी लवंग प्रिझर्व्हटिव्ह म्हणून वापरतरत.तसंच लोणची आणि मुरंबे खराब होऊ नये म्हणून हवाबंद बरणीत ठेवतात.

close