खरेदीचं बजेट

March 14, 2009 3:13 PM0 commentsViews: 6

खरेदीचं बजेटजागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं आपण श्रीमंत व्हामध्ये आपली खरेदी आणि आपलं बजेट या विषयावर यावेळी चर्चा केली. कार्यक्रमात गुंतवणूक तज्ज्ञ प्रेरणा साळस्कर-आपटे यांनी मार्गदर्शन केलं. आपण वर्षभर काही ना काही खरेदी करत असतोच. म्हणजेच आपण असतो ग्राहकाच्या भूमिकेत. पण ग्राहक म्हणून खरेदीचा आनंद घेण्याइतकीच महत्त्वाची आहे आपली बचत आणि आपली गुंतवणूक. आपल्या खर्चाचा आणि बचतीचा बॅलन्स कसा सांभाळायचा हे आपण श्रीमंत व्हामध्ये समजून घेतलं. आपल्या हातून खरेदीच्यावेळी बरेचदा अनावश्यक खर्चही केले जातात, कधीतरी एखादी वस्तू घेण्याचा मोह आवरता येत नाही पण अशावेळी विचारपूर्वकच खरेदीसाठी पुढं जावं असं तज्ज्ञांनी सांगितलं. शॉपोहोलिक म्हणजे शॉपिंग करण्याच्या आहारी गेलेल्या लोकांनीही आर्थिक नियोजन करुनच, बचत करूनच खरेदीला हात घातला पाहिजे असं त्यांनी सुचवलं. महागडी वस्तू घेताना महिन्याच्या किंवा वर्षाच्या सुरुवातीलाच प्लॅनिंग करायला सुरूवात करावी असं प्रेरणा यांनी सांगितलं. आपल्या उत्पन्नापेक्षा कधीही आपली खरेदी किंवा खर्च वाढता कामा नये असंही त्या म्हणाल्या. तसंच क्रेडिट कार्डावरून खरेदी करणं किंवा कर्ज, उसनवारी करून खरेदी करणं टाळलेलं बरं अशी सूचना त्यांनी केली. एकूणच भविष्यकाळाचा विचार करूनच खरेदी करतानाही त्यातही बचत कशी करता येईल याचाही विचार मनात असावा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

close