काळजी वृध्दत्त्वातली

March 16, 2009 11:18 AM0 commentsViews: 71

16 मार्चच्या टॉक टाइम'चा विषय होता काळजी वृद्धत्त्वातली. या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं. रोज ऑफिसला जाणारा घरातला पुरुष एक दिवस रिटायर होतो,त्याची घरी नसण्याची सगळ्यांना इतकी सवय झालेली असते की अनेकदा रिटायड झाल्यानंतर घरातले नातेसंबंध बिघडतात. ही सुरवात असते म्हातारपणाची…असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे म्हातारपणाबद्दल बोलताना सांगत होते. डॉ. आशिष देशपांडे सांगतात, " म्हातारपण ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी पायरी असते. त्या पायरीचंआर्थिक नियोजन अनेक जण करतात… पण भावनिक आणि नातेसंबंधांमध्ये होणार्‍या बदलांचं काय? त्याचं नियोजन करणंही तितकचआवश्यक आहे.आपण नोकरी करत असताना आपल्या मेंदूला सतत काम करण्याची, विचार करण्याची सवय लागलेली असते.अचानक आलेल्या रिकामेपणामुळे अनेकांची चिडचिड होणं,असुरक्षित वाटणं,आपण नकोसे आहोत असं वाटणं नैसर्गिक आहे. मात्र त्यावर मात करुन हे म्हातारपण हे आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. " सकरात्मक दृष्टिकोनाबाबत डॉ. आशिष देशपांडे सांगतात, " आयुष्यातल्या दुस-या इनिंगच्यावेळी अनेक जेष्ठ नागरिक संघ,सामाजिक संस्थांमध्ये निवृत्त व्यक्तींना त्यांनी कमावलेल्या ज्ञानाचा, कामाचा उपयोग करता येईल. आवडत त्या छंदामध्ये मन गुंतवलं तर त्याचाही उपयोग होतो. आहाराची काही पथ्यं पाळणं आवश्यक आहे. कारण वयापरत्वे आपली पचनसंस्था, शरीराची हाडं, यांचं काम करण्याच्या वेगामध्ये बदल घडतो,आपल्या म्हातारपणाचं योग्य प्लॅनिंग केलतं तर हा जवळजवळ 15 वर्षांचा काळ तुमच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय काळ ठरू शकतो. " मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांचं मार्गदर्शन व्हिडिओवर ऐकता येईल.

close