युथ ट्युब भाग 3 : आयकॉन पीडीया – कॅलिग्राफीकार र.कृ. जोशी

March 16, 2009 6:20 PM0 commentsViews: 9

युथ ट्युब भाग 3 : आयकॉन पीडीया – कॅलिग्राफीकार र.कृ. जोशीसुलेखन अर्थात कॅलिग्राफी म्हटलं की पहिलं नाव समोर येतं ते र.कृ. जोशींचं. र.कृ. जोशींमुळे भारतात कॅलिग्राफीला मान्यता मिळाली. र.कृ. कॅलिग्राफीकडे का वळले यामागचं कारण अतिशय भावस्पर्शी आहे. कम्प्युटरवर आपण मराठी किंवा इतर भाषांमध्ये लिहू शकतो, त्यामागे र.कृं.चं मोठं योगदान आहे. सी-डॅक या संस्थेच्या मदतीनं त्यांनी हे फाँट विकसित केले. र.कृ. हे कवीही होते, तसंच अनेक जाहिरात संस्थांमध्ये त्यांनी मोठी पदं भूषवली आहेत. तसंच युथ ट्युबच्या या भागात आम्ही कॅग ऍवॉर्ड म्हणजे कम्युनिकेशन आर्टिस्ट गिल्ट ऍवॉर्ड पटकावणा-या जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना भेटलो तसंच जे.जे.कॉलेजमधल्या पारंपरिक चुंगी गेमबद्दल जाणून घेतलं. चुंगी गेम आणि कॅलिग्राफीकार र.कृ. जोशींबद्दल जाणून घेण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close