समस्या केसांची

March 18, 2009 3:50 PM0 commentsViews: 243

19 मार्चच्या टॉक टाईम ' चा विषय होता समस्या केसांची. या विषयावर हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.राजेश रजपूत यांनी मार्गदर्शन केलं. बदलती जीवनशैली, रोजचं टेन्शन या सगळ्याचा परिणाम शरीराबरोबरच आपल्या केसांवरही होतो. मग अकाली केस गळणं, ते पांढरे होणं आणि टक्कल पडणं अशा समस्यांना अगदी तरुण वयातच सामोरं जावं लागतं. टॉक टाईममध्ये हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.राजेश रजपूत केसांच्या समस्या आणि त्यांची काळजी यावर बोलले. डॉ. राजेश रजपूत सांगतात, " पूर्वी लोकांचे केस वयाच्या 40-45 पर्यंत पांढरे व्हायचे. पण आता अगदी वीशीतही केस पिकतात. अशा वेळी आपल्या आहार पध्दतीत बदल केला पाहिजे. तळलेले, बेकरी, चायनीज, सॉफ्ट ड्रिंक्स असे पदार्थ टाळले पाहिजेत,केसांचं उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपी घालावी. केसांना तेल लावणं आवश्यक आहे,तेलामुळे केसांची वाढ होते हा गैरसमज आहे. तेलामुळे केसांच्या मुळाशी एक संरक्षक थर तयार होतो ज्यामुळे धुळ,प्रदुषणापासून केसांचं संरक्षण होतं. " हल्ली केस हायलाईट करण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचाही केसांवर परिणाम होतो. त्यावर डॉ. राजेश रजपूत सांगतात, " केसांना कलरिंग करतानाअमोनिया फ्रि कलर वापरावा. ज्यामुळे केसांचं कमीत कमी नुकसान होतं. जन्माला येताना आपल्या डोक्यावर 1 लाख 20 हजार केस असतात, केस गळणं नवीन केस येणं ही प्रक्रिया सतत चालू असते. चांगल्या केसांसाठी थोडे कष्ट आणि वेळ देण्याची गरज आहे. " डॉ. राजेश रजपूत यांनी केलेलं मार्गदर्शन पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close