मधुमेह आणि स्थूलता

March 17, 2009 3:56 PM0 commentsViews: 97

17 मार्चच्या टॉक टाईमचा विषय होता मधुमेह आणि स्थूलता. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डायबेटीस तज्ज्ञ डॉ.विजय कुलकर्णी आले होते. स्थुलता हे मधुमेह होण्याचं एक प्रमुख कारण आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे आजकाल तरुण वयातच वाढलेले वजन ही समस्या असलेले अनेक लोक आपल्याला पहायला मिळतात. मधुमेह आणि स्थूलतेविषयी डॉ.विजय कुलकर्णी सांगतात, " आपलं वजन आणि ब्लड शुगर योग्य असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपल्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन तयार करतं मात्र त्याचं प्रमाण योग्य नसेल किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा आपल्या शरीराला काही उपयोग होत नाही तेव्हा एखाद्याला मधुमेह होतो,याची लक्षणं म्हणजे मधुमेहाच्या सुरवातीला वजन कमी होतं, तहान, भूक आणि लघवीचं प्रमाण वाढतं. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं तर वजन आटोक्यात राहू शकतं ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. " डॉक्टरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close