93 च्या बॉम्बस्फोट कटातील ग्रेनेडचा वापर

December 11, 2008 3:15 PM0 commentsViews: 32

मुंबई, 11 डिसेंबर मुंबईतील 26/11 हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला एकमेव अतिरकी मोहम्मद अजमल कसाबची नार्को टेस्ट करण्याचे संकेत मुंबई क्राईम ब्राँचनं दिले आहेत.26/ 11 हल्ल्यासंदर्भात नवनवीन माहिती येत आहे. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात वापरण्यात आलेले हॅण्ड ग्रेनेड 26/ 11 च्या कटातही वापरले गेल्याची माहिती पुढे येत आहे. ग्रेनेडवर ऑस्ट्रीयन कंपनीचा लोगा असून पाकिस्तानाला कंपनीनं फ्रॅन्चाईज दिली आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्रीपासून अतिरेक्यांनी शहरात ठिकठिकाणी बेछूट गोळीबाराबरोबर ग्रेनेड फेकून दहशत निर्माण केली होती. 26/11 च्या कटात झरार शहाचं नाव पुढे आलं आहे. अतिरेक्यांकरता त्याने कम्यनिकेशन नेटवर्क उभारल्याची माहिती पोलिसांच्या क्राईंम ब्राँचच्या हाती आली आहे.

close