गोष्ट नॅनोची

March 22, 2009 9:14 AM0 commentsViews: 2

सामान्यांच्या स्वप्नातली आणि आवाक्यातलीही 'कार अशी ख्याती असलेल्या नॅनोची किंमत एक लाख 30 हजारांपेक्षाही जास्त होणार आहे. नॅनोच्या या दरवाढीच्या बातमीमुळे मध्यमवर्गाच्या कार खरेदीचं स्वप्न हे 'स्वप्न'च राहणार की काय असं वाटू लागलं आहे. पण या दरवाढीचा अंदाज अजून तज्ज्ञांना आला नसल्यानं नॅनोची खरंच दरवाढ होणार की नाही यावर कुणाचंच एकमत होत नाहीये. बाजारात नॅनोच्या दरवाढीची हाईप होण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत तयार झालेल्या नॅनो कार्स. आतापर्यंत फक्त 800 नॅनो कार तयार झाल्याआहेत. तरीही सध्या नॅनोचं उत्पादन वाढवणं टाटा मोटरसाठी शक्य नाहीये. यापूर्वी सिंगुरच्या वादामुळे नॅनोचा प्लांट गुजरातमध्ये हलवावा लागला. तो प्लान्ट सर्व सोयीसुविधांनी युक्त नव्हता. तो या वर्षाखेरीपर्यंत तयार होणार असल्यामुने सध्या नॅनोचं उत्पादन उत्तरखंडातल्या पंतनगर प्लांटमधून होत आहे. ही परिस्थिती पाहता नॅनोच्या बुकिंगसाठी ग्राहकांना 50 हजार रुपये भरावे लागणार असून त्यावर टाटा मोटर्स व्याज देणार आहे. ही गोष्ट नॅनो खरेदी करण्याचं स्वप्न बाळगणा-यांसाठी खचितच् दिलासा देईल. नॅनोचा प्रवास पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close