उन्हाळा आणि आरोग्य

March 23, 2009 8:38 AM0 commentsViews: 147

23 मार्चच्या 'टॉक टाईम'चा विषय होता उन्हाळा आणि आरोग्य. या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे यांनी मार्गदर्शन केलं. वाढतं उन आपल्या सगळ्यांनाच हैराण करतं. लोकलचा प्रवास, घामाच्या धारा आणि त्यात असह्य उकाडा या सगळ्यांनीच आपण वैतागून जातो. तरअसा असह्य उकाडा सुसह्य व्हावा म्हणूनच 'टॉक टाईम'मध्ये उन्हाळा आणि आरोग्य या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अर्चना जानुगडे बोलल्या. असह्य उकाड्यावर गार पाणी, कोल्डड्रिंक्स,आईसक्रिम असे बाह्य उपचार करण्यापेक्षा आपला आहार आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यात बदल केला तर या उकाडा नक्कीच सुसह्य होईल. लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, कोकम अशा फळांचे रस किंवा सरबतं घेणं हे केव्हाही चांगलं. उन्हाळ्यात वातावरणातलं तापमान वाढतं. त्यामुळे घाम येतो आणि शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे चक्कर येणं, मूत्रदाह, डोळ्यांची जळजळ,निद्रानाश असे विकार होतात. त्यामुळे उन्हाळ्यात जेवण हे दोन घास कमी खावं. पण चहा,कॉफी आणि मसालेदार खाणं टाळावं. पित्ताचा त्रास जास्त होत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जावं, असे महत्त्वपूर्ण सल्ले आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अर्चना जानुगडे यांनी दिलेत.

close