त्रास ऍसिडिटीचा

March 24, 2009 2:06 PM0 commentsViews: 796

24 मार्चच्या टॉक टाईमचा विषय होता ' त्रास ऍसिडिटीचा '. याविषयावर ग्रॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. नितीन नरवणे यांनी मार्गदर्शन केलं. उन्हाळा वाढला की बहुतेकांना पित्ताचा त्रास होतो.अशावेळी काही तात्पुरते उपाय केले जातात आणि आपण वेळ मारून नेतो. पित्ताच्या त्रासापासून कायमरूपी कसा आराम मिळवायचा, यावरचे उपाय डॉ. नितीन नरवणे यांनी सांगितले. शरीरातील ऍसिडचं प्रमाण वाढलं की पित्त होतं. खूप लोकांना आपल्याला पित्ताचा त्रासआहे हे माहितीचं नसतं अति तेलकट आणि मसालेदार खाणं,अन्न भरभर, नीट न चावता गिळणं,अपुरी झोप, मद्यपान भूक नसतानाही खाणं या आणि अशा अनेक कारणांमुळे पित्ताचा त्रास होतो,म्हणुनच आधी आपल्या आहारात बदल केला पाहिजे…पेनकिलरच्या अतिसेवनानंही पित्त होऊ शकतं. यासाठी बाहेरचं खाणं हे कमी केलं पाहिजे. रोज 8 ग्लास पाणी प्यायलंच पाहिजे. असे काही घरगुती उपाय केल्यास पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.ऍसिडिटी म्हणजे शरीरात ऍसिड तयार होणंऍसिडिटीची कारणं -अति तेलकट आणि मसालेदार खाणं.अन्न भरभर, नीट न चावता गिळणंअपुरी झोप, मद्यपानभूक नसतानाही खाणंबाळाच्या वाढीबरोबरच गर्भाशयाचीही वाढ होत असल्यानं पचनेंदि्रयावर दाब येतो आणि ऍसिडिटी होतेऍसिडीटीची लक्षणं-पोटात आणि छातीत जळजळ होणं आंबट ढेकर येणेजेवल्यावर पोटात दुखणे, पोटाला तडस लागणं उलटी होणेउपाशी राहिल्यास पोटदुखी सारखं डोकं दुखणंऍसिडीटी टाळण्यासाठी -तेलकट, तुपकट खाणं टाळा. वेळेवर जेवा.दिवसातनं निदान आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक.जेवल्यानंतर लगेच झोपू नका.डोकं आणि खांदा सरळ रेषेत ठेवून झोपा.

close