पर्याय करिअरचे

March 28, 2009 1:30 PM0 commentsViews: 67

टेक ऑफचा विषय होता ' पर्याय करिअर'चे. या विषयावर गेस्ट होते करिअर मार्गदर्शक बाळ सडवेलकर आणि पूनम घाडीगावकर.टीप्स :आपल्या आवडीप्रमाणे करिअर शोधा.नकारात्मक विचार सोडा.इंग्रजी बोलण्यास शिका.जिद्द अंगी बाळगा.करिअर ठरविण्याआधी आत्मनिरीक्षण करा.करिअर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.स्वत:ची ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्या.स्वत:शी साधलेला संवाद हा नेहमीच आपल्याला योग्य दिशा दाखवतो कोणतं क्षेत्र निवडावं? कोणतं शिक्षण घ्यावं? कुठं नोकरी शोधावी?कोणता उद्योग करावा? या सर्व प्रश्नांचा उत्तरं शोधणं आवश्यक आहे .आपल्याला ज्यात करिअर करायचं असेल त्याविषयी विचार करायला आणि माहिती गोळा करायला सुट्टीचा उपयोग करा .करिअरविषयी माहिती देणारी मॅगझिन वाचा.SWOTS ऍनालिसिसएका कागदावर ओळी आखा आणि त्या कागदाला चार भागांमध्ये विभाजित करा.पहिला भाग : S- (Strength) सामर्थ्यदुसरा भाग : W (weekness) कमकुवतपणातिसरा भाग : O (opportunity) संधीचौथा भाग : T (Threats) अनिष्ट सूचना, धोका आता प्रत्येक भागातील प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहापहिल्या भागात विचारायचे प्रश्नS (Strength) सामर्थ्यमाझ्यात कोणतं कौशल्य आहे ?कोणत्या क्षेत्राचा अभ्यास माझा आवडीचा आहे ?माझ्यात किती सामर्थ्य आहे ?मला माझ्यात कोणते गुण दिसतात ?लोकांना माझ्यात कोणते गुण दिसतात ?दुसर्‍या भागात विचारायचे प्रश्नW (weekness) कमकुवतपणामाझ्यात कोणती कमी आहे ?माझ्यात कोणते अवगुण आहेत ?माझ्यात कोणत्या वाईट सवयी आहेत ?कशामुळे मी पुढं जाऊ शकत नाही ?माझ्या मनात कोणती भीती आहे ?तिस-या भागात विचारायचे प्रश्नO (opportunity) संधीकोणत्या संधी सहजपणे मला मिळू शकतात ?कोणत्या संधी माझ्या आवडीशी मेळ खातात ?संधी निर्माण कशा कराव्यात ?कुणाची मदत घेता येईल ?संधी कुठं शोधाव्या ?चौथ्या भागात विचारायचे प्रश्न T (Threats) अनिष्ट सूचना, धोका माझे विचार नकारात्मक आहेत का?त्यांनी काय फरक पडत आहे?माझी मानसिक क्षमता आहे का?माझे ध्येय स्पष्ट आहे का?लोकांशी माझे संबंध कसे आहेत?काही महत्त्वाच्या वेबसाईट्सwww.indiaedu.comwww.indiastudychannel.comwww.educatingjane.comwww.csuchico.eduwww.vineland.orgwww.delta.edu

close