गुढीपाडवा मुक्ता बर्वेसोबत

March 27, 2009 1:39 PM0 commentsViews: 41

27 मार्चच्या गुढीपाडव्याचं औचित्य साधून टॉक टाईम 'मध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वेला आमंत्रित करण्यात आलं होतं. आयबीएन-लोकमतच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेनं गुढीपाडवा ' आयबीएन-लोकमत ' बरोबर साजरा केला. आणि तिच्या सोबत मनसोक्त गप्पा मारण्याची संधी तमाम रसिकांना मिळाली. खरंतर दरवर्षीचा गुढीपाडवा मुक्ता आपल्या घरच्यांसोबत साजरा करते. पण यावर्षीचा गुढीपाडवा तीनं आयबीएन लोकमत बरोबर साजरा केला. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिनं तिचे वेगवेगळे अनुभव सांगितले. ' जोगवा 'आणि ' एक डाव धोबीपछाड ' या तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला खूप मजा आली. ' धोबीपछाड 'बद्दल सांगताना तिने अशोक सराफ यांचा आवर्जून उल्लेख केला. ' फायनल ड्राफ्ट ' आणि ' कबड्डी-कबड्डी ' दोन्ही नाटकांच्या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं, ' असं मुक्तानं सांगितलं. तिनं हिंदी आणि मराठी अशा अनेक सिरिअल्स आणि सिनेमांमध्येही कामं केली. तिला या तिनही माध्यमांमध्ये काम करायला आवडतं. माध्यम कुठलंही असो, स्क्रिप्ट आणि आपलं काम महत्त्वाचं. अभिनयाच्याबरोबरीनं संगीत आणि कॉस्च्युम डिझायनिंग करायलाही तिला आवडतं. पण अभिनय केला की बाकी सगळं करायला मिळतं असं तिला वाटतं. विनोदी भूमिका करताना खूप मजा येते असं ती म्हणाली. शेवटी ' धोबीपछाड ' या तिच्या फेमस कॉमेडी सिनेमातले काही डायलॉग्स तिनं म्हणून दाखवले.मुक्ताच्या या मनसोक्त गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.