बेकायदेशीर निर्णयाच्या फायली थांबवल्या जातील- मुख्यमंत्री

December 11, 2008 3:20 PM0 commentsViews: 2

मुंबई, 11 डिसेंबर माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी क्लिअर केलेल्या शेकडो फायलींना स्टे देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. याबाबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना खुलासा केलाय. बेकायदेशीररित्या निर्णय झालेल्या सर्व फाईल्स थांबवून त्यांचा आढावा घेतला जाईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाणांची ही पहिली वहिली सविस्तर मुलाखत आहे. ' चुकीच्या निर्णयाच्या फायली थांबवल्या जातील.विवादास्पद आणि बेकायदेशीर निर्णयांचा आढावा घेतला जाईल. राणे यांनी कोणते निर्णय घेतले हे मला माहीत नाही ', असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण मुलाखतीत म्हणाले

close