फायनान्स आणि करिअर

April 4, 2009 3:30 PM0 commentsViews: 16

सध्याचे दिवस थोडेसे मंदीचे आहेत. लोकांना फायनान्समध्ये करिअर होईल की नाही याची चिंता लागून राहिली आहे. यावरचं सोल्यूशन मिळालं ते टे क ऑफच्या ' फायनान्स आणि करिअर ' या कार्यक्रमातून. ' फायनान्स आणि करिअर ' या भागातून फायनान्समधल्या निरनिराळ्या करिअरविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. ते मार्गदर्शन केलं मॅनेजमेंट तज्ज्ञ मधुसुदन सोहनी आणि मॅनेजमेन्ट तज्ज्ञ प्रा. अनंत आमडेकर यांनी. ते पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

विम्याचे प्रकार, त्यातील धोके,त्याचं व्यवस्थापन आणि आर्थिक गणित सांभाळणं हे ऍक्चुअरीचं काम असतं. इन्स्टिट्युट ऑफ ऍक्चुअरीज ऑफ इंडिया तर्फे ऍक्चुअरीज निवडेले जातात.याच संस्थेत विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागते.मॅथेमॅटिकल सायन्स मधल्या गणित,स्टॅटिस्टिक,अर्थशास्त्र,इंजिनिअरींग आणि ऍक्चुअल सायन्स या विषयापैकी कोणत्याही विषयातील पदवीधर ऍक्चुअरी होऊ शकतो.

एकुण चार ग्रुप्समध्ये ही परीक्षा होते

CT,CA,ST आणि SA .या परीक्षेत एकूण 15 विषय असतात.वर्षातून दोन वेळा मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होते.वेगवेगळ्या प्रकारचे विमे,फायनान्स कंपनी,सरकारी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये काम करता येतं.चार गुप्सपैकी प्रत्येक ग्रुप्सची फी वेगवेगळी असते.चारही ग्रुप्स मिळून साधारणत:45 हजार फी असते.

CFP-सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर

फायनॅन्शिअल प्लॅनिंग स्टॅंडर्ड बोर्डातर्फे हा कोर्स घेतला जातो.या कोर्सची पात्रता -

12 वी पास कोणतीही व्यक्ती हा कोर्स करु शकते.मात्र पुढील अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पहिले 4 मॉड्युल करण्याची गरज नाही.CA किंवा CFS किंवा ICWA कोर्स केलेले विद्यार्थी हा कोर्स करु शकतातइकोनॉमिक्स, कॉमर्स, मॅथ्स, फायनान्स यात Ph.D किंवा M.Phill,UPSC परीक्षा उत्तीर्ण किंवालॉचे पदवीधरांनाही हा कोर्स करता येतो.

फायनॅन्शिअल प्लॅनिंग स्टॅंडर्ड बोर्डातर्फे घेण्यात येणारे कोर्सेस -

IIBF -इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग ऍन्ड फायनान्सPGDFA- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनॅन्शिअल ऍडव्हायजिंगएज्युकेशन प्रोव्हायडरचार्टर्ड मेंबर

कोर्स फी FPSB- 25,000 रु.एज्युकेशन प्रोव्हायडर- 20,000रुIIBF – 20,000 रुPGDFA – 20,000 रुचार्टर्ड मेंबर – 50,000 रु

भारतात तसचं परदेशातही फायनॅन्शिअल तज्ज्ञ म्हणून काम करता येते

actuaries च्या वेबसाईटस्www.actuaries.orgwww.fpsb.orgwww.fpvarsity.comwww.caclubindia.com

close