भारती विद्यापीठाच्या रस्त्यावरून पुन्हा वाद

December 11, 2008 3:00 PM0 commentsViews: 15

11 पुणेअद्वैत मेहता पुण्यातल्या भारती विद्यापीठातून जाणा-या रस्त्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. हा रस्ता रद्द करण्याचे प्रयत्न राज्य सरकारनं सुरू केले आहेत. या रस्त्याची एक लाख स्क्वेअर फूट जागा घरांसाठी देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पण हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी पुणेकरांची मागणी आहे. पुणे-सातारा रोडवरच्या भारती विद्यापीठाच्या आवारातला रस्ता रद्द करून हा भाग निवासी क्षेत्रासाठी देण्याचा आदेश सरकारनं दिला आहे.पण त्याआधी इथल्या लोकांना विचारात घेतलेलं नाही. रहिवाशांची मतं जाणून घेण्याची मुदत संपल्यानं आता हा विरोधही बारगळण्याची चिन्हं आहेत.भारती विद्यापीठातला हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचा लोकायुक्तांचा , स्थानिक पोलिसांचा अहवाल आहे. स्थानिकांनी वेळोवेळी आंदेलनही केली आहेत तरीही राज्य सरकार उदासिन आहे. कारण भारती विद्यापीठाचे सर्वेसर्वा असलेले पतंगराव कदम हे राज्य सरकारमधील वजनदार नेते आहेत म्हणून त्यांचा विरोध असल्यानं ही अडवणूक होतं आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या परिसरात सुमारे 1 लाख लोक राहतात. रस्ता न झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे. इथले नागरिक सांगतात, रस्ता बंद झाल्यानं येता जाताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.लहान मुलांना खूप त्रास होतो. कदम साहेबांनी किंवा भारती विद्यापीठानं काहीतरी करून रस्ता खुला करावा.अशोेक चव्हाणांच्या नव्या नेतृत्त्वाखालचं सरकार आता सामान्य पुणेकरांना मदत करणार की, नव्या महसूलमंत्र्यांच्या दबावाला बळी पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close