गप्पा सुरेखा गाडे आणि भगवान रामपुरे यांच्याबरोबर

April 8, 2009 2:25 PM0 commentsViews: 12

7 एप्रिलच्या 'सलाम महाराष्ट्र'चे पाहुणे होते पुण्यातल्या कागद काच पत्रा कष्टकरी संघटनेच्या सदस्या सुरेखा गाडे आणि सोलापूरमधले प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे.

कचरा गोळा करणार्‍या स्त्रियांच्या कौटुंबिक, सामाजिक, आरोग्यविषयक समस्यांना केंद्रस्थानी ठेवून या महिलांना संघटित करण्याचं प्रमुख काम सुरेखा गाडे गेली 17 वर्षं करत आहेत. या रॅक पिकर्सना सरकारकडून निधी तर नाहीच पण सामाजिक, आथिर्क आणि आरोग्यविषयक सुरक्षाही पुरवल्या जात नाहीत. अशा महिलांना वैद्यकीय सेवा देणं, त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवणं, पतपेढीत खाती उघडून देणं अशा सेवा पुरवण्याचं काम केलं जातं. रॅक पिकर्सना योग्य मदत मिळवून देण्याचं काम या संस्थेत केलं जातं. रॅक पिकर्ससारख्या इतरही गरजू आणि श्रमिक महिलांसाठी गावागावांत अशा संघटना स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन देणं हे या कागद काच पत्रा कष्टकरी संघटनेचं उद्दिष्ट आहे. शेअर मार्केटचा बुल, बौद्धाचं लोकप्रिय शिल्प, तेंडुलकरांचं शिल्प घडवणारे सोलापूरमधले प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टस्‌मधून कलेचं प्रशिक्षण घेतलं. आज ते सोलापुरामधल्या चित्रशाळेत शिल्प घडवतात. त्यांची आजवर लोकप्रिय ठरलेली शिल्पं अनेक आहेत यापुढेही ते स्वामी समर्थांच्या जन्मापासू्‌न जीवितकार्यापर्यंतचा प्रवास शिल्पकलेतून साकारणार आहेत. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये या दोघांशी मारलेल्या गप्पा पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close