श्री साईबाबा समाधीचे पेटंट!

October 25, 2010 10:59 AM0 commentsViews: 99

25 ऑक्टोबर

कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन शिर्डी संस्थान आता साईबाबा समाधीचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

साईबाबांच्या भक्तांप्रमाणेच जगभरात बाबांची मंदीरेही वाढत आहेत. काही ठिकाणी तर बाबांच्या समाधीचीही प्रतिकृती निर्माण केली गेली आहे.

कुणाचीही समाधी एकच असू शकते. त्यामुळे बोगस समाध्या उभारणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात साईबाबा संस्थानला अडचण येत आहे.

त्यामुळे साईबाबा समाधीचा कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी संस्थान प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिली आहे.

बाबांच्या समाधीची प्रतिकृती तयार करुन भाविकांची दिशाभूल करण्यात येते आहे.

त्यामुळे शिर्डी संस्थान कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन समाधीचे पेटंट मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

close