भज्जी आणि श्रीसंतमध्ये बॉक्सिंग

October 25, 2010 11:01 AM0 commentsViews: 1

25 ऑक्टोबर

हरभजन सिंग आणि एस श्री संत यांची नावे एकत्र निघाली की पहिले आठवते ते आयपीएलच्या पहिल्या हंगामात दोघांमध्ये झालेले भांडण आणि भज्जीने श्रीसंतला लगावलेली थप्पड.

आज मुंबईत दोघे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. आणि यावेळीही दोघांमध्ये एक बॉक्सिंगची मॅच झाली.

पण अर्थातच ही लढाई लुटुपुटूची होती. श्रीसंतशी आपली चांगली दोस्ती आहे, असे हरभजनने मीडियाशी बोलताना सांगितले.

मैदानावर आम्ही दोघे आक्रमक असतो. आणि त्या नादात आयपीएलमध्ये तो प्रसंग घडला.

पण त्यानंतर आम्ही भारतीय टीममध्ये एकत्र खेळलो आहे. आमच्यात चांगली दोस्ती आहे, असे हरभजन म्हणाला.

close