काठोडा प्रकरणाचा आज निकाल

October 25, 2010 10:31 AM0 commentsViews: 2

25 ऑक्टोबर

बीड जिल्ह्यातील काठोडा बलात्कार आणि दरोडा प्रकरणी आज निकाल लागणार आहे.

काठोडामध्ये 2008 मध्ये एकनाथ तिष्टक यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता.

या दरोड्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारही करण्यात आला होता.

तसेच एकनाथ तिष्टक यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती.

गेल्या दीड वर्षांपासून, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरु होता. आज या प्रकरणी निकाल येणार आहे.

close