मंदिरावरून मुले फेकण्याची प्रथा बंद होणार

October 25, 2010 1:41 PM0 commentsViews: 7

25 ऑक्टोबर

राज्यात एकीकडे अंधश्रद्धेतून निष्पाप लोकांचे बळी जात असताना सांगली जिल्ह्यात मात्र एक चांगली घटना घडली आहे.

सांगली जिल्ह्यातील घानद गावात लहान मुलांना मंदिरावरुन खाली फेकण्याची प्रथा बंद करण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे.

आता यापुढे पुजार्‍याच्या हातात मूल देऊन त्याचा स्वीकार करण्याची प्रथा गावकर्‍यांनी स्वीकारली आहे.

सिद्धनाथाच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी लहान मुलांना मंदिराच्या छतावरुन फेकण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती.

पण अखेर तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे गावकर्‍यांनी या वर्षापासून ही प्रथा बंद केली आहे.

close