माथाडी कामगारांचा संप मागे

October 25, 2010 2:34 PM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर

अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर माथाडी कामगारांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. काल मध्यरात्रीपासून हा संप पुकारण्यात आला होता.

माथाडी कामगारांच्या सर्व मागण्यांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

एपीएमसीवर सरकारचे नियंत्रण हवे, या मुख्य मागणीसाठी माथाडी कामगारांनी हा संप पुकारला होता.

या संपाचा फटका सामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता होती. पण आता संप मिटल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

close