अंगणवाडी सेविकांचा बेमुदत बंद

October 25, 2010 3:31 PM0 commentsViews: 5

25 ऑक्टोबर

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 18 ऑक्टोबरपासून बेमुदत बंदचे आंदोलन सुरु केले आहे.

पुण्यातही गेला आठवडाभर अंगणवाडीसेविकांचे आंदोलन सुरू आहे.

त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी सेविकांना, मदतनिसांना मानधनाऐवजी किमान वेतन देऊन सरकारी कर्मचारी करा, भाऊबीजेची रक्कम 2000 पर्यंत वाढवा, अंगणवाडी सेवकांना पेन्शन योजना लागू करा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पाठिंबा दिला आहे.

close