अखेर बाळासाहेबांना प्रत्युत्तर

October 25, 2010 3:50 PM0 commentsViews: 5

25 ऑक्टोबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले.

दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी राज यांच्यावर आपली 'कॉपी' करत असल्याची थेट टीका केली होती. तसेच राज यांनीच उद्धव यांना कार्याध्यक्ष केल्याचा खुलासा केला होता.

बाळासाहेबांच्या या टीकेला आज डोंबिवलीतील प्रचारसभेत थेट उत्तर दिले. लहानपणापासून बाळासाहेबांच्या छायेतच आपण वाढलो. त्यांनीच माझ्यावर संस्कार केले. मला चित्रे काढण्यासही शिकवले. त्यामुळे मी त्यांच्याप्रमाणेच बोलणार, हे साहजिकच आहे, असे ते म्हणाले.

पण बाळासाहेबांच्या भाषा, शैलीवर आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांचाच प्रभाव जाणवतो, यांचीही त्यांनी आठवण करून दिली.

शिवसेनेवर टीका करत असतानाच त्यांनी इतर पक्षांचाही राज यांनी समाचार घेतला.

कल्याण-डोंबिवलीचा कायापालट होणे शक्य आहे, असे सांगत मनसेच्या रुपाने मतदारांना नवा पर्याय सापडला आहे, असेही ते म्हणाले.

close